DNA न्यूज़।गोंदिया
जंगल परिसरातील गावाकडे वन्यजीवांचा वावर अधिक वाढत आहे .एवढेच नव्हे तर जंगल लगत असलेल्या परिसरात जनावरे चरण्यासाठी गेलेल्या जनावरांवर वाघ व बिबट्यांच हल्ला होत आहे . अशीच एक घटना सडक अर्जुनी तालुक्यात घडली आहे या घटनेत वाघाच्या
हल्ल्यात गायीचा मृत्यू झाला आहे.
चराईसाठी जंगलात सोडण्यात आलेल्या गाईच्या कळपावर वाघाने हल्ला करून एका गाईच्या फडशा पाडल्याची घटना सडक अर्जुनी तालुक्यातील खडकी व डोंगरगाव/डेपो जंगल शिवारात सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार खडकी येथील परमानंद धुर्वे या शेतकऱ्याची गाय कळपामध्ये डोंगरगाव / डेपो बीटात सोडण्यात आली असता वाघाने अचानक कळपावर हल्ला करून गाईची शिकार केली. घटनेची माहिती गुराख्याने गावकऱ्यांना दिली. गावकऱ्यांनी जंगल शिवार गाठून वन विभागाला माहिती दिली. दरम्यान, सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. विशेष म्हणजे, मागील एक महिन्यापूर्वीच बाम्हणी येथील वामन गजभिये यांच्या शेतामध्ये वाघाचे पगमार्क आढळून आले होते. बाम्हणी, खडकी, डोंगरगाव/डेपो आदी गावे एकमेकाशेजारी असताना प्रादेशिक वन विभागाच्या जंगलाला लागून आहेत.tiger attack त्यात कालच्या घटनेनंतर परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान, शेतकरी शेतामध्ये जाण्यास टाळत असून दैनंदिन जीवनावर याचा परिणाम होत आहे. वन विभागाने सदर वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, तसेच हल्ल्यात जनावरे गमावलेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांची आहे,
Post a Comment