पूर्व विदर्भाच्या शिक्षण व हरित क्रांतीचे जनक स्व. मनोहरभाई पटेल यांना अभिवादन* DNA न्यूज़।गोंदिया

              DNA न्यूज़।गोंदिया 
*9 फेब्रुवारी जयंती निमित्त विशेष लेख
(प्रो. डाँ. बबन मेश्राम)
        प्रेम, माणुसकी, निस्वार्थपणा, समाजोन्नती, अश्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी आणि पूर्व विदर्भातील शिक्षण व हरित क्रांतीचे जनक म्हटले कि स्वर्गीय मनोहर भाई पटेल यांचे नाव स्मरणात येते. कोणतेही पॅड नसत्तांना समाजासाठी काही करण्याची इच्छा शक्ती असली कि ते साध्य होते हेच स्व मनोहरभाई पटेल यांनी करून दाखविले. त्यामुळे गोंदिया भंडारा जिल्हा चा नव्हे तर सम्पुर्ण विदर्भात त्यांची आठवण मोठ्या आदराने केली जाते. स्वतः ४ पर्यंत शिक्षण घेतले असतांना गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यत प्राथमिक पासून ते उच्च शिक्षण पर्यं जाळे पसरविण्याचे कुणी केले असेल तर सर्व मुखी इकाचा नाव येतो शिवाय देशाचेच पोशिंद्याची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी पूर्व विदर्भात हरित क्रांतीचा पायंडा रचणारे पूर्व विदर्भात हरित क्रांतीचा पायंडा रचणारे स्वनाम धन्य नेता स्व. मनोहरभाई पटेल.
जिल्ह्यांतील 'शिक्षण संस्थांची शिक्षण संस्था' किंवा 'जनक शिक्षण संस्था' मानली जात आहे. आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
       मनोहरभाईंनी 'गोंदिया शिक्षण संस्थे'च्या माध्यमातून १९६०-६१ मध्ये जिल्ह्यात एकाच दिवशी २३ शाळा सुरू केल्या. पुढे १९६२ मध्ये त्या सर्व शाळा जिल्हा परिषदेला हस्तांतरित केल्या. त्याचप्रमाणे इटियाडोह, सिरपूर आणि पुजारीटोला या मोठ्या धरणांचे बांधकाम करून पूर्व विदर्भात सिंचन क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. परिणामी, हजारो हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आली.
      त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सुगीचे दिवस आले. तत्कालीन भंडारा जिल्ह्यात रस्त्यांचा संपूर्णतः अभाव असताना शेत-शिवारातील पानंदी आणि माळरानांवरून गोंदिया, आमगाव, तुमसर, भंडारा यांसारख्या मुख्य रस्त्यांच्या निर्माणासह ग्रामीण भागातील अनेक छोट्या-मोठ्या रस्त्यांच्या बांधणीस चालना दिली. ग्रामीण भागात सूतिकागृह, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांच्या उभारणीस प्रोत्साहन दिले. मनोहरभाईंनी आपल्या संपत्तीचा उपयोग गरीब आणि दलितांच्या उद्धारासाठी केला. त्यांच्या औदार्याच्या साक्षीदार असलेल्या अनेक संस्था विदर्भात नांदत आहेत. आपल्या गुणांचा व संपत्तीचा समाजासाठी उपयोग करणारा मनोहरभाईंसारखा उदार पुरुष विरळाच. १७ ऑगस्ट १९७० रोजी अशा या महापुरुषाच्या निधनाने संपूर्ण जिल्हा हळहळला. जिल्ह्याने अभूतपूर्व शोक व्यक्त केला केला.
    संकलन-प्रो. डाँ. बबन मेश्राम, समाजशास्त्र विभाग, प्रमुख, एन. एम. डि काँलेज, गोंदिया 
मो. नं 907508028

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post