पास्को अंतर्गत गुन्हा दाखल असूनही आरोपी चार दिवसापासून मोकाट…
DNA न्यूज़ गोंदिया
जिल्ह्यातील देवरी येथे पुन्हा काळीमा फासणारी घटना घडली.एका राजकीय पक्षासी सबंधित असलेल्या सेवानिवृत्त प्राचार्याने स्वतःच्या घरी सुरु केलेल्या वसतिगृहातील एका पंधरा वर्षीय मुलीला पत्नीच्या साडीला प्रेस मारून दे या बहाण्याने जबरस्ती हात पकडून मनाविरुध्द गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.विशेष म्हणजे सदर आरोपी व्यक्ती हे एका राजकीय पक्षासी संबधित असल्याने पास्को अंतर्गत गुन्हा दाखल होऊन चार दिवसापासून पोलिसांच्या हाती लागले नसल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.सदरची घटना ही २४ एप्रिल २०२६ रोजी सायकांळी ५ ते ६ वाजे दरम्यानची आहे.
सविस्तर असे की पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे देवरी पोलीस स्टेशन येथे आरोपी सेवानिवृत्त प्राचार्य काशिनाथ शहारे यांच्या विरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी हा गेल्या चार दिवसापासून पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.चार दिवस लोटूनही आरोपी हा अद्यापही मोकाट असल्याने पोलिसांच्या विरुद्ध नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.तसेच या प्रकरणाची माहिती प्रसारमाध्यमांना देण्याच्या बाबतीतही देवरी पोलीस ठाणे प्रमुख यांनी टाळाटाळ केली होती.सदर प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरिक्षक मुकेश राठोड हे करीत आहेत
Post a Comment