कान्होली ग्रामपंचायत येथे जवानाच्या हस्ते ध्वजारोहण DNA न्यूज़ गोंदिया

           DNA न्यूज़ गोंदिया 
महाराष्ट्र दिनानिमित्त सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करणे हा एक अत्यंत अभिमानास्पद आणि देशभक्तीचा संदेश देणारा उपक्रम आहे मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांचा सन्मान करण्यासाठी आणि समाजात देश प्रेमाची भावना जागृत करण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे. अशीच एक अभिनव संकल्पना अर्जुनी मोरगाव तालुक्यात राबविण्यात आली. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत अर्जुनी मोरगाव पंचायत समिती अंतर्गत कान्होली ग्रामपंचायतच्या प्रांगणात यंदा ध्वजारोहणाचा कार्यक्रम विशेष पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. ग्रामपंचायतचे सरपंच छायाताई अमले यांच्या अध्यक्षतेखाली कानोली गावचे सुपुत्र ज्ञानदेव जागेश्वर अमले या एसआरपीएफ जवानाच्या हस्ते १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायत कानोलीच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला असून ही संकल्पना अन्य ग्रामपंचायतीसाठी प्रेरणा देणारी ठरत आहे.
 १ मे १९६० रोजी बॉम्बे राज्याचे विभाजन होऊन मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. गोंदिया जिल्ह्यातील कारंजा पोलीस मुख्यालयात पालकमंत्री , अन्य खात्याचे मंत्री किंवा जिल्हाधिकारी यांच्या   हस्ते ध्वजारोहण केले जाते, तर राज्यभरातील शासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालयांमध्येही ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
याच पार्श्वभूमीवर अर्जुनी मोरगाव पंचायत समितीने अंतर्गत येणाऱ्या कानोली ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने यंदा नव्याने नियुक्त झालेल्या सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सरपंच छायाताई अमले  यांच्या अध्यक्षतेखाली जवान ज्ञानदेव अमले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यादरम्यान जवान ज्ञानदेव अमले यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी उपसरपंच जागेश्वर मते, ग्रामपंचायत सदस्य मळकाम, काटेंगे, रोकडेताई, गावड ताई, कोरेटी ताई, वलके ताई, ग्रामपंचायत कर्मचारी रामचंद्र रहिले, राजेश कोरे,रतीराम कुंभरे केंद्रप्रमुख मेश्राम ,विशेष शिक्षक पुस्तोडे, मुख्याध्यापक राऊत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नेताम, अंगणवाडी सेविका, कृषी सखी, महिला बचत गट सदस्य, शालेय विद्यार्थी व संपूर्ण गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षक मेश्राम यांनी केले तर आभार संगणक चालक बोहरे मैडम यांनी मानले.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post