गोंदिया जिल्ह्यातील 7 पोलिस निरीक्षकांच्याबदल्या- विशेष पोलिस महानिरीक्षक यांचे पत्रDNA न्यूज़ गोंदिया

विशेष पोलिस महानिरीक्षक यांचे पत्र
DNA न्यूज़ गोंदिया 
गोंदिया,पोलिस आस्थापना मंडळ क्रमांक 2 यांना प्रदान असलेल्या शक्तीचा वापर करुन पोलिस आस्थापना मंडळ क्र.2 यांनी विहीत कालावधी पूर्ण झालेल्या राज्यातील 169 पोलिस निरीक्षकांच्या बदलीला मान्यता दिली असून यात गोंदिया जिल्ह्यातील 7 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या इतरत्र ठिकाणी करण्यात आल्या आहेत. विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) यांनी दिलेल्या पत्रानुसार महाराष्ट्र पोलिस अधिनियम, 1951 मधील कलम 22 न, पोट कलम (1) मध्ये नमुद केल्याप्रमाणे ही कार्यवाही करण्यात आली आहे.
 ज्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील देवरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रविण गोविंद डांगे यांची भंडारा जिल्ह्यात बदली करण्यात आली असून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात कार्यरत नंदिनी विनायकराव चानपूरकर यांची पोलिस उपमहानिरीक्षक कार्यालय नागपूर, तर योगिता सुभाषराव चाफले यांची चंद्रपूर जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. त्याचबरोबर गोरेगावचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत राजमल काळे यांची नागपूर ग्रामीण, गोंदिया शहर पोलिस ठाण्याचे किशोर जयवंत पर्वते यांची लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, सालेकसाचे पोलिस निरीक्षक भुषण यादोराव बुराडे यांची नागपूर ग्रामीण तर स्थानिक गुन्हे शाखाचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शत्रुघ्न अहेरकर यांची यवतमाळ जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. दरम्यान, बदली झालेल्या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त न करता पर्यायी व बदलीवर येणाऱ्या अधिकाऱ्यांची वाट न पाहता तत्काळ कार्यमुक्त करण्याचे सदर पत्रात नमूद करण्यात आले

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post