No title

उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांच्या रिक्त जागेसाठी राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

जिल्हा प्रतिनिधी गोंदिया, भंडारा-गोंदिया विधान परिषद मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान होणार असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) मोठी राजकीय घडामोड घडली आहे. पक्षाच्या कोर कमिटी बैठकीत विदर्भातील ज्येष्ठ नेते व खा. प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत जवळचे राजेंद्र जैन यांच्या नावावर राज्यसभेसाठी शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातील पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. व
भंडारा-गोंदिया विधान परिषद मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिलेले राजेंद्र जैन हे खासदार प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. यावेळी विधान परिषद निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, महायुतीतील जागावाटपात ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी पक्षांतर्गत चर्चांना वेग आला होता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या या जागेवर राज्यसभा सदस्य होत्या. त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने ही जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी छगन भुजबळ तसेच नवनीत राणा यांच्या नावांचीही चर्चा होती. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोर कमिटी बैठकीत सदर जागेच्या उमेदवारीसाठी राजेंद्र जैन यांच्या नावाला पसंती मिळाली तसे बैठकीनंतर तटकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, राजेंद्र जैन हे दोन वेळा विधान परिषद सदस्य राहिले असून सध्या गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत. तसेच गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव म्हणूनही ते कार्यरत आहेत. विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.राज्यसभेच्या उमेदवारीसाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या वृत्तानंतर भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून विदर्भात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सक्षम नेतृत्व मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. आगामी काळात राजेंद्र जैन यांची राज्यसभेतील भूमिका आणि विदर्भाच्या प्रश्नांबाबतची मांडणी महत्त्वाची
ठरणार आहे.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post