DNA न्यूज़। गोंदिया
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणी/नुतनीकरण व विविध लाभाच्या योजना नि:शुल्क राबविण्यात येत आहेत. सदर सेवा मंडळामार्फत कोणतेही शुल्क न आकारता देण्यात असले तरीही बांधकाम कामगारांकडून ऑनलाईनरित्या नोंदणी/नुतीनकरण करुन देणे तसेच विविध योजनांचे आर्थिक लाभ मिळवून देण्याकरीता कोणतीही खाजगी व्यक्ती, त्रयस्थ व्यक्ती, संस्था, संघटना किंवा अनोळखी इसमाकडून पैश्यांची अथवा कागदपत्रांची मागणी होत असल्यास, अशा भूलथापांना व आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी आकाश कांबळे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील इमारत व इतर बांधकाम स्वरुपाचे काम करणाऱ्या बांधकाम कामगारांचे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणी/नुतनीकरण व विविध लाभाच्या योजनेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येत असून पात्र बांधकाम कामगारांना अर्ज सादर करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची व मंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती मंडळाचे संकेतस्थळ www.mahabocw.in या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे.
बांधकाम कामगारांच्या नोंदणीचे निकष : कामगाराचे वय 18 ते 60 वर्षे असावे व मागील वर्षभरात 90 दिवसापेक्षा अधिक दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे. संबंधित पात्र बांधकाम कामगारांना अर्ज व्यक्तीश: ऑनलाईन पध्दतीने नमुद संकेतस्थळावर भ्रमणध्वनी व आधारकार्ड क्रमांकासह भेट देवून अर्ज सादर करता येईल.
Post a Comment