No title

बांधकाम कामगारांसाठी सूचना 

बांधकाम कामगारांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये
* सरकारी कामगार अधिकाऱ्यांचे आवाहन
 DNA न्यूज़। गोंदिया बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणी/नुतनीकरण व विविध लाभाच्या योजना नि:शुल्क राबविण्यात येत आहेत. सदर सेवा मंडळामार्फत कोणतेही शुल्क न आकारता देण्यात असले तरीही बांधकाम कामगारांकडून ऑनलाईनरित्या नोंदणी/नुतीनकरण करुन देणे तसेच विविध योजनांचे आर्थिक लाभ मिळवून देण्याकरीता कोणतीही खाजगी व्यक्ती, त्रयस्थ व्यक्ती, संस्था, संघटना किंवा अनोळखी इसमाकडून पैश्यांची अथवा कागदपत्रांची मागणी होत असल्यास, अशा भूलथापांना व आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी आकाश कांबळे यांनी केले आहे.
        जिल्ह्यातील इमारत व इतर बांधकाम स्वरुपाचे काम करणाऱ्या बांधकाम कामगारांचे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणी/नुतनीकरण व विविध लाभाच्या योजनेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येत असून पात्र बांधकाम कामगारांना अर्ज सादर करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची व मंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती मंडळाचे संकेतस्थळ www.mahabocw.in या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे.
         बांधकाम कामगारांच्या नोंदणीचे निकष : कामगाराचे वय 18 ते 60 वर्षे असावे व मागील वर्षभरात 90 दिवसापेक्षा अधिक दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे. संबंधित पात्र बांधकाम कामगारांना अर्ज व्यक्तीश: ऑनलाईन पध्दतीने नमुद संकेतस्थळावर भ्रमणध्वनी व आधारकार्ड क्रमांकासह भेट देवून अर्ज सादर करता येईल. 
       याबाबत काही अडचणी असल्यास जिल्हा कामगार सुविधा केंद्र, बोपचे कॉम्पलेक्स, पहिला माळा, बालाघाट रोड, आझाद वार्ड, गोंदिया तसेच सहायक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, तिसरा माळा, खोली क्र.35, जयस्तंभ चौक, गोंदिया येथे संपर्क साधावा.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post