DNA न्यूज़।गोरेगांव गोंदिया
भगवान भोलानाथ हे कोट्यावधी भक्तांचे आराध्य दैवत आहेत. महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकराची स्थाने व तीर्थस्थळ भक्ताच्या गर्दीने फुलून निघाली आहेत. गोंदिया जिल्ह्यातील घनदाट जंगलात वसलेला पोंगेझरा शिवमंदिर व स्वयंभू गायमुख या पवित्र स्थळाचे दर्शन करण्यासाठी भाविक एक दिवसाच्या अगोदरपासूनच पायदळ चालून मोठी गर्दी केली आहे. पोंगेझरा शिव मंदिर हे ठिकाण श्रद्धाचे स्थान म्हणून ओळखले जाते. येथे लहान मुलाची नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने नवसाचे नंदी आणले जाते. नंदी हे शंकराचे वाहन असून नवसाचा नंदी शंकराला वाहण्याची इथे पारंपरिक प्रथा आहे. हिरापूर गावातून वाजत गाजत बिसेन कुटुंब गावकऱ्यासह पोहा घेऊन नंदीची यात्रा महाशिवरात्रीच्या एक दिवसा पूर्वीच पायदळ पायदळ निघाली. यादरम्यान महादेवाला जातो गा ,हर हर महादेव असा गजर करीत पारंपरिक वाद्यांच्या गजरात भक्तांनी महादेवाच्या मंदिरात हजेरी लावली.
गोरेगांव तालुक्यातील ग्राम हिरापुर येथे महाशिवरात्री पर्वाच्या निमित्ताने अत्यंत भक्तिमय व मंगलमय वातावरणात नंदी (पोहा) पूजन व मिरवणुकीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
ग्राम हिरापुर येथील
माजी उपसभापती, पंचायत समिती गोरेगांव सुरेंद्रजी बिसेन यांच्या निवासस्थानी भगवान महादेवांच्या कृपेने चि. चित्रांश यांच्या नावाने कुलदैवत पोंगेझरा देवस्थान (बोळुंदा) येथे नेण्यासाठी नंदी (पोहा) पूजन विधी संपन्न झाला. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी पारंपरिक वाद्यांच्या निनादात व “हर हर
महादेव”च्या
जयघोषात ही भक्तिमय नंदी मिरवणूक संपूर्ण हिरापुर गावातून बोळुंदा येथील पवित्र देवस्थानाकडे नेण्यात आली. यावेळी गावातील तसेच परिसरातील भाविकांनी प्रत्येक घरासमोर आरती करून भगवान महादेवांच्या नंदीचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले. संपूर्ण परिसर शिवमय झाल्याचे भाविकांनी अनुभवले.
महाशिवरात्री पर्वानिमित्त पुढील धार्मिक कार्यक्रमांची रूपरेषाही जाहीर करण्यात आली असून १५ फेब्रुवारी रोजी पोंगेझरा देवस्थान येथे नंदी देवदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच १६ फेब्रुवारी रोजी माऊली कार्यक्रम होणार असून त्यानंतर दुपारी ३.०० वाजता हिरापुर येथील निवासस्थानी सर्व आमंत्रित व निमंत्रित भाविकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
إرسال تعليق