गोरेगाव मोहाडी येथील वऱ्हाडी घेवून येणाऱ्या बसला मोठा अपघातएकाचा घटनास्थळावर मृत्यू, ४ गंभीर : कारंजा परिसरातील घटनाDNA न्यूज़। गोंदिया महाराष्ट्र

     DNA न्यूज़। गोंदिया महाराष्ट्र 
गोरेगाव तालुक्यातील मोहाडी येथील वरखडे कुटुंबातील लग्नाच्या वऱ्हाड्यांनी  भरलेली ट्रॅव्हल्सचा अपघात झाल्याने एकाचा मृत्यू झाला तर ४ वऱ्हाडी गंभीर जखमी झाल्याची घटना गोंदिया - गोरेगाव मार्गावरील कारंजा मार्गावर घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली.
मध्य प्रदेश राज्यातील माखेपार येथील वधूच्या घरी लग्न समारंभ पार पाडून मोहाडीच्या दिशेने परत येणाऱ्या वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रॅव्हल्सचा ओव्हरटेकच्या नादात अपघात झाला. या घटनेत एका वऱ्हाड्याचा घटनास्थळावर मृत्यू झाला. तर ४ वऱ्हाडी गंभीररीत्या जखमी झाले. ही घटना गोंदिया-गोरेगाव मार्गावरील कारंजा नजीक आज, १२ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली. मृताचे नाव सोनू घनशाम उईके (२७, रा. वाडी नागपूर) असे आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव तालुक्यातील चोपा मोहाडी येथील वरखडे कुटुंबाने मध्यप्रदेशातील खैरलांजी नजीक असलेल्या माखेपार येथील मुलगी पसंत केली होती. ११ मार्च रोजी वऱ्हाडी अविनाश ट्रॅव्हल्स कंपनीच्या एमएच ०३, एन ९३५२ क्रमांकाच्या बसने माकेपार येथे लग्नाला गेले होते. लग्न आटोपून रात्रीच्या सुमारास ४५ वऱ्हाडी घेवून बस मोहाडीच्या दिशेने निघाली. पहाटेच्या सुमारास कारंजा नजीक ट्रॅव्हल्सच्या चालकाने टरबूज भरलेल्या मालवाहकाला ओव्हरटेक करत असताना ट्रॅव्हल्सने मालवाहकाला धडक दिली. यात ट्रॅव्हल्सवरून चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याखाली उतरली. घटनेनंतर मात्र भितीपोटी चालकाने खिडकीतून उडी मारून पळ काढला. घटना घडली तेव्हा बसमध्ये असलेले सर्व वऱ्हाडी साखरझोपेत होते. मात्र अपघात होताच वऱ्हाड्यांत एकच धावपळ माजली. काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत खिडकीतून बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कारंजा येथील नागरिकांनी घटनास्थळ गाठून जखमींना तातडीने रुग्णालयात हलविले. या घटनेत सोनू घनशाम उईके (२७, रा. वाडी नागपूर) या प्रवाशाचा मृत्यू झाला. तर ४ प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले. त्यात हेमराज चौहाण (५०, रा. कवळीटोला), शोभा उदल पंधरे (७०, रा. कोहमारा), नैतीक शाम सिडाम (१४, रा. कोहमारा) आणि लक्ष्मी घनशाम उईके (६५, रा. वाडी नागपूर) यांचा समावेश आहे. गोंदिया ग्रामीण पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास करत आहेत.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post