होळी : आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारा सणDNA न्यूज़।गोंदिया महाराष्ट्र

.       DNA न्यूज़।गोंदिया महाराष्ट्र 
भारत हा सण, उत्सव प्रिय देश आहे. भारत देशामध्ये वेगवेगळ्या राज्यात, वेगवेगळ्या विभागात विविध प्रकारचे सण, उत्सव साजरे केले जातात. खान्देशातील सातपुडा आदिवासी समाजामध्येही होळी सणाला फार महत्त्व आहे. आदिवासी बांधवांचा सर्वात मोठा सण म्हणून होळी सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आदिवासी समाजाचा होळी सण म्हणजे एक प्रकारे दिवाळीच होय. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातही होळी नावाचा सण अतिशय जोमाने, उत्साहाने आदिवासी बांधव साजरा करताना दिसतात. सातपुड्यातील नंदुरबार जिल्ह्यातील' काठी' गावचा होळी सण' राजवाडी होळी' म्हणून ओळखला जातो व तो मोठ्या प्रमाणात उत्साहाने, आनंदाने साजरा केला जातो. या उत्सवाला साडेसातशे वर्षाचा समृद्ध असा इतिहास आहे. काहीजण म्हणतात की या सणाची सुरुवात बाराव्या शतकापासून झाली आहे. हा सण संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे.
देशातील अनेक आदिवासी बांधव या ठिकाणी येऊन होळी सण साजरा करताना दिसतात. त्यामुळे या होळीचे महत्त्व आणि आकर्षण लहान, थोर, तरुण, तरूणी सर्वांनाच आहे. हा सण आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर साजरा करून आनंद मिळवत असतात.सरोजनी वावर म्हणतात की, "आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहावे, आपले नित्याचे व्यवहार सुरळीतपणे पार पाडले जावेत आणि आपले आयुष्य सुखी जावे. पामधील माणसाचे समाधान सणासुदीच्या निमित्ताने आणखीनच फुलून जाते." अगदी त्याच प्रमाणे आदिवासी बांधवही आपले घर, आपले जीवन, मुले सर्व सुखी राहावेत, आनंदी राहावेत त्याचबरोबर आपल्या घरामधील वातावरणही प्रसन्न राहावे. कुठलीही इडापिडा आपल्या मागे लागू नये म्हणून हा 'होळी' सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. होळी सणासाठी लागणारे साहित्य, कपडे, आदिवासी बांधव भोगऱ्या बाजारातून मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. त्याचबरोबर प्रसाद म्हणून डाळ्या, फुटाणे, साखरेचे कंगनहार घेण्यासाठी आदिवासी वांधव या भोगऱ्या बाजारात मोठी गर्दी करतात. होळी उत्सवासाठी आदिवासी बांधव बाजारातून विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी चाजारपेठेत गर्दी करताना दिसतात. होळी सणाच्या दिवशी पारंपारिक पद्धतीने वेशभूषा करण्यात येते. त्यासाठी लागणारे घुंगरू, शोभेचे साहित्य, रंगीबेरंगी कागद, कपडे व विविध वस्तू खरेदी करण्यासाठी आदिवासी युवक, युवती आणि जेष्ठ सणाच्या दोन-तीन दिवसापासून अगोदर बाजारात गर्दी करतात, हा होळीचा सण आदिवासी बांधवांमध्ये पाच दिवस साजरा केला जातो. काठी गावात 'राजवाडी होळी म्हणून जी साजरी केली जाते. काही ठिकाणी आदिवासी बांधव हा उत्सव पंधरा दिवस साजरा करताना दिसतात. काही गावांमध्ये तर होळीच्या सणाला पाच ते सात दिवस आधीच या सणाला प्रारंभ होतो. या सणाला गावातील काही अविवाहित मुलं संध्याकाळी एकत्र येऊन खोंड्या पेटवतात आणि त्यातून सगळ्या गावाला होळीचा सण जवळ येत आहे याची जाणीव करून देतात. त्याचबरोबर गावांमधील काही तरुणी आपापल्या किंवा प्रत्येकाच्या अंगणात जाऊन पारंपारिक होळीच्या संदर्भातील गीते गाऊनही आनंद साजरा करताना दिसतात, याच वेळेला हे तरुण प्रत्येकाच्या घरातून हरभरा, वाटाणा, गहू, तांदूळ व इतर काही धान्य गोळा करतात आणि या धान्याचा उपयोग होळीसाठी नैवेद्य करण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर होळी हा सण मोठ्या आनंदात साजरा होण्यासाठी' फाग' म्हणूनही काही जणांकडून म्हणजे इतरांकडून पैसेही गोळा केले जातात.
भारतातील आदिवासी जमातीतील स्त्री-पुरुषांचा हा होळी दिवस आनंदाचा असल्यामुळे गुलाल उधळून, टीमक्या, ढोल वाजवून, नृत्य करून मोठ्या उत्साहाने साजरा करतात. महाराष्ट्रातील आदिवासी जमातीतील लोकात होळी सण मोठ्या आनंदाचाच. त्यामुळे तेही आदिवासी बांधव आपल्या भोजनामध्ये गोडधोड पदार्थांचा व मांसाहाराचाही समावेश करतात. या दिवशी स्त्रिया व पुरुष वेगवेगळ्या प्रकारचे दागदागिने घालून नक्षीकाम केलेला पोशाख घालून विविध वाद्यांच्या तालावर नृत्य करून आपला आनंदोत्सव साजरा करतात. घुंगरू, मोरपिसाचा टोप, ढोलकी, मोठा बोल, बासरी, शस्त्र, असा विविध प्रकारचा साज परिधान करून आणि अंगावर विविध रंगाचे नक्षीकाम केलेले कपडे परिधान करून उत्सवात सामील होतात. हे आदिवासी बांधव अनेकांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. खरे तर या सणासाठी कुणालाही कुठल्याही प्रकारचे आमंत्रण दिले जात नाही किंवा यामध्ये मानसन्मान दिला जात नाही तरीही हजारो आदिवासी बांधव या होळी सणाच्या उत्सवाला अगदी मनापासून हजेरी लावतात आणि अगदी मनसोक्त आनंद लुटताना दिसतात. डॉ.म.सु. पगारे म्हणतात की, लोकांनी, लोकोत्सव आणि सन साजरी केल्यामुळे त्यांची मने आणि भावना आनंदी बनतात. लौकिक जीवन व्यवहारात त्यामुळे सणाचे आणि लोकोत्सवाचे स्थान महत्त्वपूर्ण महटले पाहिजे.'
आणि म्हणूनच आदिवासी बांधव या होळीच्या सणांमध्ये एकमेकांना रंग लावून मोठ्या आनंदाने साजरा करताना दिसतातच दिसतात परंतु विविध पारंपारिक गाणी, पारंपारिक नृत्य करूनही आनंद
साजरा करतात. होळीच्या या सणांमध्ये अनेक आदिवासी पुरुष यांधव स्त्रियांचा पोशाख परिधान करून नृत्य करतानाही दिसतात. आपापल्या इच्छा म्हणजेच मनोकामना पूर्ण होण्यासाठी या होळीच्या सणाच्या निमित्ताने अनेक आदिवासी बांधव नवसही करतात. 'होळी' ही राजाची मुलगी ती 'भोंगडा' आदिवासी तरुणाच्या प्रेमात पडते. तो बांबू पासून वस्तू तयार करण्याचे काम करत असे. ही गोष्ट राजाला मान्य नसते. तेव्हा होळी अग्नीच्या ज्वालामध्ये उडी घेते. तिचे सत्य प्रेम असल्याने ती अग्नीतून जिवंत चालत येते. म्हणून राजा तिचे लग्न त्या 'भोंगडा' या तरुणावरोवर लावून देतो. यावरूनही आदिवासी तरुण-तरुणींना आपल्या मनासारखा जीवनशक्ती मिळावा म्हणून होळीला आदिवासी भागात भोगऱ्या बाजाराची परंपरा दृढ झाली आहे. अशीही आख्यायिका सांगितली जाते.
सातपुडा पर्वतातील आदिवासी बांधव होळीच्या दरम्यान 'काठी' उत्सव फार मोठ्या प्रमाणावर साजरा करताना दिसतात. काठी उत्सवाची परंपरा बाराच्या शतकापासून असल्याचीही सांगितले जाते. काठी उत्सवासाठी लागणारा जो बांबूचा दांडा आणण्याची परंपरा ही शतकोत्तर आहे. हा दांडा गुजरात राज्यातील जंगलातून काही वंश परंपरागत आदिवासी बांधव पायपीट करून आणत असतात. हा होळीसाठी लागणारा दांडा कोणत्याही हत्याराचा वापर न करता केवळ लाकडी साहित्याने बांबूला मुळासकट काढले जाते. हा दांडा गुजरात मधील डेडियापाडा तालुक्यातील जंगलातून आणला जातो. तो जवळ जवळ सत्तर फूट उंचीचा असतो. हा
दांडा रस्त्यातून आणत असताना जी गावे लागतात त्या गावातील आदिवासी बांधव या दांड्याची मनोभावे पूजा करतानाही दिसतात. होळीच्या दिवशी हा दांडा गावात आणला जातो. दांडा जमिनीत गाडून होळी पेटवण्याअगोदर नऊ फेऱ्या घेऊन होळीचे गीत गायले जाते. रात्री जागरण करून पहाटे पाचला होळी पेटवली जाते. होळी पेटवल्यानंतर काही आदिवासी स्वी-पुरुष ढोल वाजवून, मद्य पिऊन होळीभोवती नाचगाणे करतात. काही लोक सोंगे धारण करतात. काही लोक नवस फेडण्यासाठी ही सोंगे धारण करून होळीला नैवेद्य दाखवितात.
होळी पेटवल्यानंतर होळीचा दांडा जोपर्यंत खाली पडत नाही तोपर्यंत आदिवासी बांधव शांत बसून राहतात. दांडा पडल्यानंतर त्या दांड्या भोवती नऊ फेऱ्या मारल्या जातात. त्यावेळी दोन मुली पुजाऱ्याच्या मागे असतात. एक पाणी टाकते व दुसरी भाताचे दाणे टाकते. होळीच्या दांड्याचे सात तुकडे करतात व ते होळी टाकतात. हे सर्व झाल्यानंतर सवाल की चरोबर याच्यासाठी भाताचे दाणे दिले जातात. दाणे मोजून झाल्यानंतर होळी मातीच्या पाया पडतात. पूजेचे सर्व साहित्य पुजारी होळीत टाकतो. नंतर पुजारी आदेश देतो की आता तुम्ही पूजा करू शकतात. आदिवासी बांधव यांची पूजा झाल्यानंतर लोक घरी जातात आणि जेवर्ण करतात.
दुसऱ्या दिवशी प्रत्येकाच्या घरी या होळी सणाच्या निमित्ताने आदिवासी बांधव मांसाहारी जेवण तयार करतात. काही तरुण मंडळी प्रत्येकाच्या परी नाचत नाचत जाऊन ते जेवण गोळा करतात. संध्याकाळी पुन्हा दुसऱ्या दिवशी होळीला नैवेद्य देऊन जमलेल्या मंडळीला जेवण खाऊ घालतात.
दुसऱ्या दिवसापासून ते पाचव्या दिवसापर्यंत म्हणजे होळी विजेपर्यंत लोक ठीक ठिकाणी नाचायला जातात वेगवेगळे पोशाख परिधान करतात. काही पुरुष महिलांचे पोशाख परिधान करतात अशा पद्धतीने हा उत्सव पाच दिवस साजरा केला जातो.
शेवटच्या दिवशी संध्याकाळी दोन-चार हांडे पाणी आणून होळी बाईचे स्मरण करून आमच्या गावात सुख शांती लाभू दे पुतच्या वर्षी असाच उत्सव साजरा करू अशी मंत्रोपचार करून गावाचा पुजारी ते त्या पाण्याने होळी विझवतो. ते पाणी आदिवासी बांधव प्राशन करतात. आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून आदिवासी चांधव त्या हंख्यातील पाणी प्राशन करतात. अशा पद्धतीने होळीचा कार्यक्रम साजरा केला जातो. विशेष करून काठीची होळी आणि धडगाव ची होली प्रसिद्ध आहे ती होळी पाहण्यासाठी देशभरातील लोक येतात.
(संकलन  प्रा. डॉ. मस्के)

0 تعليقات

إرسال تعليق

Post a Comment (0)

أحدث أقدم