होळीच्या रंगात रंगतांना DNA न्यूज़।गोंदिया महाराष्ट्र

      DNA न्यूज़।गोंदिया महाराष्ट्र 
होळी आणि रंग यांचे समीकरण अतिशय घट्ट आहे होळी हा आनंद उत्साह प्रेम आणि बंधुभाव यांची अनुभूती देणारा सण आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण रंगांची उधळण करून आनंदाने हा सण साजरा करतात मनातले हेवे दावे द्वेष राग इत्यादी होळीच्या रंगात विरून जातात आणि सर्वत्र मैत्रीचे नाते निर्माण होते होळीच्या रंगात रंग त्यांना मौज मजा उत्साह आनंद आणि नवीन अनुभूतींचा साठा मनाच्या कप्प्यात जपून ठेवावासा वाटतो. पूर्वी म्हणजे अगदी प्राचीन काळी राधा कृष्णाची होळी ही अत्यंत उल्लेखनीय व प्रसिद्ध होती .ज्यात प्रेमाचा, त्यागाचा व आपुलकीच्या संदेश होता निसर्गात देखील वसंत ऋतूचे आगमन आणि अल्हाददायक वातावरण याने निसर्गात जणू रंगपंचमी साजरी होते. डवरलेले आम्रतरु, अंगभर फुललेला पळस पर्णहीन होऊ नये फुललेली शाल्मली बहावा करंज्याचा आणि कडुलिंबाचा बहर फुलण्यास आतुर झालेला मोगरा अबोली कुंदा आणि गुलाबाचे फुललेले ताटवे या नैसर्गिक रंगाने आसमंतात जणू रंगोत्सव साजरा होत असतो. यातच फाल्गुन महिन्यात अवतरतो तो होळीचा सण !अनेक नैसर्गिक रंग तयार करून खेळली जाणारी होळी खऱ्या अर्थाने उत्साहवर्धक आणि आनंददायी होती. मात्र अलीकडच्या काळात होळीच्या रंगात मोठ्या प्रमाणावर रासायनिक घटकांचा वापर केला जातो व त्यात निरंतर वाढ होते आहे. बाजारात हे रंग सहजपणे उपलब्ध आहेत हे कृत्रिम रंग आकर्षक दिसतात पण त्वचा डोळे आणि श्वसन संस्थेवर त्यांचे घातक परिणाम होतात .हे रंग तयार करताना वापरल्या जाणाऱ्या पाण्यात ते विरघळतात. त्यामुळे जल स्त्रोत दूषित होतात मातीची गुणवत्ता कमी होते. त्यामुळे सुरक्षित आणि पर्यावरण पूरक होईल खेळण्याचा संदेश देण्याची गरज वाटू लागते. निसर्गाने दिलेल्या अनेक घटकांपासून विविध रंगांचे होळीचे रंग तयार करता येतात हे रंग पर्यावरण पूरक व आरोग्यवर्धक असतात.
    झेंडू ची फुले हळद पळस गुलाब बीट ,मेहंदी, पालक, आवळा, कडुलिंबाची पाने, डाळिंबाची साले ,इत्यादींपासून नैसर्गिक रंग तयार करता येतात. हे रंग वर्षभर साठवून ठेवता येतात. ज्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाहीत. वर्तमान काळात होळी खेळताना चांगल्या रंगांच्या भावनेपेक्षा द्वेष मत्सर, कुरघोडी इत्यादी वाईट भावनांचे रंग प्रामुख्याने दिसून येतात. कृत्रिम रंगांमुळे रंगांचे सौंदर्य शितलता व उपयोग पाहिजे त्या प्रमाणात जाणवत नाहीत. नैसर्गिक रंग तयार करून स्टार्टअप देखील करता येते ग्रामीण क्षेत्रात साजरी केली जाणारी होईल नैसर्गिक रंगाने खेळली जात असल्यामुळे त्यात स्नेह ,आपुलकी, मर्यादा ,काटकसर ,प्रेम ,जिव्हाळा यांची सुंदर गुंफण दिसून येते. 
    काळासह होळी हा सण आणि रंगपंचमी या संकल्पना देखील बदलत चालले आहेत रंगांमध्ये ज्याप्रमाणे विविधता असते त्याचप्रमाणे माणसांमधील विविधता व मनातील कलुशीतपणा अधिक दिसून येत .आहे विकासाच्या प्रवाहात आपली संस्कृती सौंदर्य तत्वे आणि परंपरा यांचा नाश होत चालला आहे. आधुनिकीकरणामुळे होळीचे लावण्य व पारंपारिकता लयास चालली आहे. होळीनिमित्त आज एक संदेश प्रकर्षाने देवाचा वाटतो की बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी निसर्गातील विविध घटक एक स्वतंत्र व्यवसाय मिळवून देणारे आहेत फक्त त्याचा वापर करणे महत्त्वाचे आहे महिला बचत गट किंवा महिलांचे इतर गट हा व्यवसाय तरुण बेरोजगार मुला-मुलींना हाताशी घेऊन सहज करू शकतात .कारण नैसर्गिक होळीचे रंग हे कोरडे असतात तसेच ते अधिक काळ टिकणारे असतात त्यामुळे पाण्याची नासाडी होत नाहीरंग तयार करण्याचा व्यवसाय कमी भांडवलात सुरू होणारा सोपा व्यवसाय आहे.उन्हाळ्यात शेतातील कामे कमी असतात त्यामुळे हे रंग सहज घरीच तयार करता येतात.हे रंग तयार करण्यासाठी कोणतेही कौशल्य किंवा प्रशिक्षण लागत नाही.या रंगांमुळे कमी वेळात जास्त नफा मिळतोया व्यवसायामुळे महिलांचे सबलीकरण होऊ शकते .या रंगांची मागणी हंगामी स्वरूपाची आहे .तरीही स्थानिक आठवडी बाजारांमध्ये ते विकणे सहज शक्य असते.शाळा व महाविद्यालयांमध्ये स्टॉल लावून या रंगांची विक्री शक्य असते. सोशल मीडियाचा वापर करून ऑनलाईन विक्री करणे शक्य असते.
 सहकारी संस्थेच्या माध्यमातून देखील या रंगांची विक्री करता येते .
शहरातील दुकाने व सोसायटी येथे देखील विक्री करता येते. 
या नैसर्गिक रंगांच्या पॅकेटवर ब्रांड किंमत व फायदे लिहिल्यास विश्वसनीयता मिळविता येते.
   नैसर्गिक होळी रंगांचे अर्थशास्त्र
घटक।                            खर्च(रु)
कच्चा माल                    1200 
मजुरी                              800
पेकेजिंग                          500
इतर खर्च                         300
एकूण खर्च                     2,800
विक्री किंमत(500 kg)    5000              नफा                               2200
थोडक्यात नैसर्गिक पदार्थांपासून होळीचे रंग तयार करणे हा आरोग्यदायी पर्यावरण पूरक आणि आर्थिक दृष्ट्या फायदेशीर उपक्रम आहे. महिला बचत गट आणि ग्रामीण उद्योजकांनी बेरोजगार तरुणांनी हा व्यवसाय केल्यास शाश्वत विकास पर्यावरण संरक्षण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते.म्हणून रंगात रंगताना नैसर्गिक रंगांनाच प्राधान्य दिले जावे.
प्रा.डॉ.वर्षा गंगणे
त्रिमूर्ती नगर देवरी

0 تعليقات

إرسال تعليق

Post a Comment (0)

أحدث أقدم