कुलदीपिका यांचा "नवोन्मेष" काव्यसंग्रहाचे विमोचनDNA न्यूज़ गोंदिया।महाराष्ट्र

       DNA न्यूज़ गोंदिया।महाराष्ट्र 
 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त  14 एप्रिल रोजी  कुलदीपिका बोरकर यांचे नवान्मेष काव्यसंग्रहाचे विमोचन करण्यात आले.
 कार्यक्रमाचे अध्यक्ष  प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्ष अरविंद भावे  मध्यप्रदेश येथील ओबीसी राष्ट्रीय कोर कमिटीचे सदस्य इंजि. महेंद्रसिंह लोधी इतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शब्दांच्या बाह्य अलंकारांना नाकारून, मानवी मनाच्या गाभाऱ्यात दडलेल्या संवेदना, संघर्ष आणि आशेचा शोध घेणारा "नवोन्मेष" हा केवळ काव्यसंग्रह नाही; तो काळ, समाज आणि माणूस यांच्यात घडणाऱ्या बदलांचा एक जिवंत प्रवास आहे. शिक्षण, स्त्रीशक्ती, मानवी नातेसंबंध, सामाजिक वास्तव आणि जीवनातील संघर्ष या विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या या कविता वाचकाला केवळ विचार करायला भाग पाडत नाहीत, तर नव्या दृष्टिकोनाने विश्व दर्शनाची प्रेरणा देतात विद्यार्थ्यांसाठी हा संग्रह फक्त ज्ञानाचा स्रोत नसून संवेदनशील, विचारशील आणि सजग माणूस घडवणाऱ्या शिक्षणाची नवी दिशा ,नव्या स्वप्नांची ज्योत प्रल्वलित करणारा हा काव्यप्रवास "नवोन्मेष". आहे.
कवयित्रीबद्दल माहिती देताना नितू डहाट यांनी सांगीतले की कवयित्री एम.ए. समाजशास्त्र, एम.फिल. समाजशास्त्र, नेट समाजशास्त्र, एम.ए. संगीत, नेट संगीत, एम.ए.शिक्षणशास्त्र, सेट शिक्षणशास्त्र, एम.ए. मराठी, एम.एड, कला शिक्षक पद‌विका अभ्यासक्रम, शालेय पदविका अभ्यासक्रम, संगीत विशारद, सितार विशारद, संस्कृत विशारद अशा पदव्यांनी अलंकृत आहेत. समग्र शिक्षा, जिल्हा परिषद गोंदिया येथे जिल्हा समन्वयक बालरक्षक पदावर कार्यरत आहेत. कुलदीपिका यांनी आपल्या 6 चित्रपदर्शनीतून सामाजिक संदेशात्मक जनजागृती केलेली आहे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तथा चित्रकला स्पर्धामध्ये परिक्षकची भूमिका निभावली आहे. त्यांचे विविध वृत्तपत्रात लेख प्रकाशित होत आहेत, प्रसार माध्यमांद्वारे गायन व चित्रकलेच्या माध्यमातून शैक्षणिक जनजागृती सतत करीत आहेत.या कार्यक्रमामध्ये कवयित्रीचा मुलगा तेजस संतोष खेरडे वय 9 वर्ष याने तीन तास पाणी वाटप केल्यामुळे समाजसेवेची भावना त्याच्या अंगी दिसल्यामुळे सर्वांनी त्याचे मन भरुन कौतुक केले आणि  रोपट देऊन तेजाचा सत्कार करण्यात आला.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post