गोंदिया शहरातील बांध तलाव शिवारात बिबट्याचा वावर; शहर व शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरणDNA न्यूज़ गोंदिया

           DNA न्यूज़ गोंदिया 
गोंदिया शहरातील सूर्याटोला बांध तलाव शिवारात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. त्यामुळे परिसरातील शहरवासी व शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. बांधला परिसरात फिरत असलेल्या नागरिकांना आज मंगळवार 28 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. दरम्यान काहींनी बिबट्याची फोटो आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्याचे हल्ले होत असताना नेहमी वर्दळ असलेल्या शहरातील सूर्याटोला बांध तलाव शिवारात एका बिबट्याचा वावर आढळून आला आहे. दररोज सकाळ आणि संध्याकाळच्या सुमारास  शहरवासी या बांध तलाव परिसरात फिरायला येतात. त्यामुळे या परिसरात नागरिकांची नेहमीच गर्दी दिसून येते. बांध तलाव परिसरात फिरत असताना काही फिरणाऱ्यांना एक बिबट्या तलाव परिसरातील शेताजवळ लपून बसलेला दिसून आला. तत्काळ बिबट्याचा व्हिडिओ, फोटो रेकॉर्ड करून आपल्या मोबाईल मध्ये कैद करून घेतला. दरम्यान फिरण्यासाठी येणाऱ्यांना बिबट्याची माहिती देऊन सतर्क राहण्याचा सल्ला दिला. बिबट्याचे दर्शन जरी फिरणाऱ्यांसाठी सुखद असले तरी बिबट्याचा वावर शहरात असल्याने वन्यजीव व मानवाच्या सुरक्षितेचा गंभीर विषय निर्माण झालेला आहे.
           नागरिकांना आव्हान
एकटे फिरू नये, रात्री बांध तलाव परिसरात व इतर संवेदनशील क्षेत्रात उशिरा बाहेर पडू नये , वन्यजीव दिसल्यास तात्काळ त्याची सूचना संबंधित विभागाला द्यावी. वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी सहकार्य करावं, असं आव्हान सुद्धा जागरूक नागरिकांद्वारे करण्यात आले आहे.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post