अपघातग्रस्त ट्रकमुळे ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात- रस्त्याच्या कडेला उलटून एका प्रवाशाचा मृत्यू, दहा जखमी -

  रस्त्याच्या कडेला उलटून एका        प्रवाशाचा मृत्यू, दहा जखमी -
DNA न्यूज़ नेटवर्क गोंदिया 
गोंदिया, रस्त्याच्या मधोमध उलटलेल्या ट्रकला डॅश लागून ट्रॅव्हल्स रस्त्याच्या शेजारील शेतात उलटून झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीत मृत्यू झाला तर दहा प्रवासी जखमी झाल्याची घटना मंगळवारी १२ मे रोजी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास गोरेगाव जवळील गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय राज्य महामार्गावरील जानाटोला परिसरात घडली. फुलेल सनंनलाल खिरवार (३०) रा. आमगाव, ता. सालेवारा जि. खैरागड (छग) असे मृतकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कुकूस (धानाचा कोंडा) घेऊन कोहमाराकडून गोंदियाच्या दिशेने येत असलेल्या ट्रक क्रमांक एमएच ४० वाय ४५९३ च्या चालकाचे सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास स्टेरिंग वरून नियंत्रण सुटल्याने गोरेगाव शहरापासून काही अंतरावरील जानाटोला परिसरातील पेट्रोल पंप समोरील भागात रस्त्याच्या मधोमध उलटला. या अपघातात चालक व वाहक थोडक्यात बचावले असले तरी सदर ट्रक रात्रभर रस्त्याच्या मधोमध उलटला असताना पोलिसांकडून घटनास्थळावर सुरक्षेच्या दृष्टीने कसलेच बॅरिगेट्स लावण्यात आले नव्हते, असे काही प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. अशातच मंगळवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास हैदराबादवरुन गोंदियाच्या दिशेने भरधाव वेगात येत असलेल्या ट्रॅव्हल्स क्रमांक एमपी ५० झेड ४९५८ च्या चालकाने ट्रकच्या शेजारून वाहन काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी ट्रॅव्हल्सची ट्रकला डॅश लागल्याने चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले व ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला शेतात उलटली. यावेळी साखर झोपेत असलेल्या फुलेल खिरवार या प्रवाशाच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर हंसराज टोरीलाल नवदाने (४३), पंचफुला नौदाने (४०), दोघेही रा. चांदीटोला, चेंबूरलाल कलपुरे (३४) रा. भिमोडी, मुनेश्वरी देशमुख (४३) लांजी (मध्य प्रदेश), राकेश कांबळे (३५), मुनीतत्न पंचेश्वर (५५), बिहारीलाल पंचेश्वर (४३) सर्व रा. सिंघारपुरी, रीतू सिंघनकुळे (२२), सावित्री पंचीतिलक (२९) दोघेही रा. भेलवाटोला व सुखवतीबाई दमाहे असे दहा प्रवासी जखमी झाले. सर्व जखमींवर गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून काही जखमींना गोंदिया येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची नोंद गोरेगाव पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

0 تعليقات

إرسال تعليق

Post a Comment (0)

أحدث أقدم