गोंदिया-तिरोडा महामार्गावर 2 कारची अमोरा-समोर भीषण धडक...वाढदिवसाची पार्टी करून परतणाऱ्या एका तरुणाचा मृत्यू.... तर 4 ते 5 जण गंभीर जखमी

 DNA न्यूज़ गोंदिया 
गोंदिया-तिरोडा महामार्गावर गंगाझरी टिकायतपूर गावाजवळ दोन चारचाकी वाहनांची आमोरा-समोर जोरदार धडक झाली असून या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.... तर 4-5 जण गंभीर जखमी झाले आहेत. हर्ष दलवाणी (25) असे मृतक तरुणाचे नाव आहे...
काही तरुण एका खाजगी जंगल रिसॉर्ट मधून वाढदिवसाची पार्टी आटोपून गोंदियाच्या दिशेने आपल्या गावाकडे परतत असताना,गुरुवार 25 जून च्या रात्री टिकायतपूर जवळ समोरून येणाऱ्या दुसऱ्या एका भरधाव चारचाकी वाहनाने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा पुढचा भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून चार ते पाच जण गंभीररित्या जखमी झाले असून जखमींवर गोंदियात उपचार सुरू आहे... घटनेची नोंद गंगाझरी पोलिसांनी घेतली आहे.

0 تعليقات

إرسال تعليق

Post a Comment (0)

أحدث أقدم