No title

निवेदन

प्रति,

मा. मुख्यमंत्री व गृहमंत्री महोदय महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई

मार्फत :- मा. तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय गोरेगांव जि. गोंदिया

विषय :- अनुसुचित जातीमधील उपवर्गीकरणास समर्थन करणाऱ्या प्रक्रीयेच्या विरोधात सामाजिक तेढ निर्माण करणारे, राष्ट्रीय स्वयमसेवक संघ व भारतीय जनता पार्टीच्या प्रतिकांच्या अवमान करणारे कृत्य निषेधार्थ असुन संबंधीतावर कायदेशीर व दंडात्मक कार्यवाही करण्याबाबद.

महोदय,

सविनय निवेदन असे की, महाराष्ट्र शासन अनुसुचित जातीमधील आर्थीक व सामाजीक दृष्टया मागास व वंचीत घटकांना न्याय मिळावा, तसेच आरक्षण व शासकीय योजनेचे लाभ खऱ्या अर्थाने दुर्बल घटका पर्यंत पोहचावेत या उद्देशाने अनुसुचित जातीच्या उपवर्गीकरणा बाबद सकारात्मक विचार करीत आहे. सर्वोच्च न्यायालयात निर्णयानंतर या विषयावर विविध स्तरावर चर्चा सुरू असुन समाजाच्या न्यायाच्या दृष्टीने हा अंत्यत महत्वाचा विषय आहे.

अशा परिस्थीतीत एका आयोजित कार्यक्रमा मध्ये आमदार मा. राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय स्वयमसेवक संघाच्या गणवेशाचे व भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हांचे अपमानकारक प्रदर्शन करण्यात आल्याचे छायाचीत्र वृत माध्येमातुन समोर आले आहे.

सदर कृत्य हे केवळ एक संघटना किंवा राजकिय पक्षाच्या विरोधापुर्ते मर्यादीत नसुन कार्यकत्यांच्या भावणाशी संबंधीत आहे. या घटनेमुळे अनेक कार्यकर्ते व नागरीकांच्या भावना दुखावल्या असुन समाजात वैमनस्य निर्माण होण्याची सक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करूण सबंधीत दोषीवर भारतीय न्याय संहिता व ईतर लागु कायदेनुसार योग्य ती कार्यवाही करावी.

हि विनंती

स्थळ - गोरेगांव

दिनांक २५/०६/२०२६

निवेदकांचे नाव

-निवेदक -

भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते ता. गोरेगांव

राष्ट्रीय स्वयमसेवक संघ ता. गोरेगांव

स्वाक्षरी

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post