प्रति,
तहसीलदार, तिरोडा/गोरेगांव,
विषयः- गोंदिया जिल्ह्याच्या गोंदिया/तिरोडा व गोरेगांव तालुक्यातील 'मातोश्री पांदन रस्ता' योननेच्या खडिकरण कामात होत असलेल्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी समिती गठित करुन खडीकरण कामांची चौकशी करुण देयके व मोजमाप पुस्तिका थांबवुन दोषी अधिकाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही करण्याबाबत.
संदर्भ:- श्री. राजेशकुमार तायवाडे पत्रकार रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एकोडी, ता.जि. गोंदिया यांचे पत्र दिनांक ०४/०६/२०२६.
उपरोक्त विषयास अनुसरून आपल्या कार्यालयाचे लक्ष वेधण्यात येते की, राजेशकुमार तायवाडे पत्रकार रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एकोडी, ता.जि. गोंदिया यांच्याकडून या कार्यालयाला तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. सदर अर्जानुसार, गोंदिया जिल्ह्याच्या गोंदिया/तिरोडा व गोरेगांव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ते आणि मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर शासकीय नियमांचे उल्लंघन, निकृष्ट दर्जा आणि आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, आपणास याद्वारे खालीलप्रमाणे तात्काळ कार्यवाही करण्यात यावे. १) देयके व मोजमापन स्थगितीः संबंधित पांदण रस्ते खडीकरण कामांची मोजमापन पुस्तिका आणि संबंधित देयके तात्काळ प्रभावाने पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात यावीत.
२) स्थळ पाहणी व तांत्रिक तपासणीः आपल्या स्तरावरून वरिष्ठ तांत्रिक अधिकाऱ्यांमार्फत (उदा. उपअभियंता/शाखा अभियंता) संबंधित कार्माची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कामाच्या गुणवत्तेची कसून तपासणी करण्यात यावी.
३) अहवाल सादरीकरणः सदर तपासणीचा सविस्तर वस्तुस्थितीदर्शक व स्वयंस्पष्ट चौकशी अहवाल तात्काळ या कार्यालयाकडे सादर करावा, जेणेकरून पुढील कडक कायदेशीर व प्रशासकीय कारवाईसाठी मा. जिल्हाधिकारी साहेबांकडे शिफारस करता येईल.
सदर तक्रारीत नमुद बाबीला अनुसरुन प्रकरण सविस्तर चौकशी करुन योग्य नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी व तसेच केलेल्या कार्यवाहीबद्दलचा अहवाल अर्जदार व या कार्यालयास ०७ दिवसाचे आत सादर करावे. सहपत्रः- मुळ तक्रार अर्ज
(पूजा गायकवाड) उपविभागीय अधिकारी, तिरोडा
तिलोपी-श्री. राजेशकुमार तायवाडे पत्रकार रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एकोडी, ता.जि. गोंदिया यांना माहीतीकरीता अग्रेसीत.
(पूजा गायकवाड) उपविभागीय अधिकारी, तिरोडा
Post a Comment