بلا عنوان

यंदा हेक्टरी ३४.२३ प्रति क्विंटलप्रमाणे धान खरेदी 

गोंदिया : शासनाने यंदा खरीप
हंगामातील धान खरेदीकरिता जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाला हेक्टरी ३४.२३ प्रति क्विंटल प्रमाणे धान खरेदी करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे अधिकचे धान आता शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना विक्री करावी लागणार असून हमीभाव मिळण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासन जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत धान खरेदी करते. शासनाने यंदा धानाला प्रति क्विंटल २४४१ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. जिल्ह्यात खरीपात सर्वाधिक १ लाख ९६ हजार हेक्टरवर धानाची
लागवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनुसार जिल्ह्यात हेक्टरी ४० क्विंटलवर धानाचे उत्पादन होते. त्यामुळेच शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच हेक्टरी ४० क्विंटल प्रमाणे शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करण्याची मागणी लावून धरली होती.शासन जिल्हा कृषी विभागाकडून धानाची प्राप्त हेक्टरी उत्पादक पाहून धान खरेदीची मर्यादा ठरवित असते. यंदा कृषी विभागाने धानाची हेक्टरी मर्यादा हेक्टरी ३४.२३ क्विंटल काढली होती. यानंतर शासनाने हीच मर्यादा निश्चित करुन त्यानुसार जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाला याच मर्यादेनुसार धान खरेदी करण्याचे आदेश गुरुवारी (दि. २२) दिले आहे. शासनाने धान खरेदीची हेक्टरी मर्यादा ४० क्विंटलवरुन ३४.२३ क्विंटल केल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे.

0 تعليقات

إرسال تعليق

Post a Comment (0)

أحدث أقدم