DNA न्यूज गोंदिया, दि.७ फेब्रुवारी
: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया अंतर्गत बुधवारी जिल्हा न्यायालय गोंदिया येथील मल्टीपरपज हॉलमध्ये ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा’ बाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष आर.एन.जोशी होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे प्रभारी सचिव एम.के. सोरते, एस.एस. गर्ल्स कॉलेजच्या प्रा.डॉ. दिशा गेडाम, तसेच जिल्हा न्यायीक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.के.सोरते यांनी केले. यावेळी जिल्हा न्यायालय गोंदिया येथील कर्मचाऱ्यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा दिवसानिमित्त मराठी भाषेच्या गोडवीवर कविता सादर केली.
कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या प्रा.डॉ. दिशा गेडाम यांनी मराठी भाषेतून उपस्थित न्यायीक अधिकारी वर्ग, वकील वर्ग तसेच न्यायीक कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणातून आर.एन.जोशी यांनी मराठी भाषा ही आज संवादातील मुख्य भाषा झालेली असून तिला अभिजात दर्जा नुकताच प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषा अन्य भाषेपेक्षा कशाप्रकारे वेगळी आहे याबाबत मार्गदर्शन केले.
إرسال تعليق