अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव/बांध येथे झालेल्या भीषण अपघातात देवरी शहरातील बहीण भाऊ यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ११ एप्रिल सायं. अंदाजे ६:३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. अंकुर अरुण शहारे (वय-१८ रा.देवरी) आणि रितिका संजय जांभुळकर (वय-१०, रा. चारभाटा/बोरगाव ता. देवरी) असे मृत बहीण भावाचे नाव आहे. तर अरुणा अरुण शहारे (वय ५० रा. देवरी) असे जखमी आईचे नाव आहे. जखमीला तात्काळ गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले आहे.
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, देवरी शहरातील वॉर्ड क्र. १४ येथे शहारे कुटुंब वास्तव्याला होते. आणि रितिका ही त्यांच्याच कुटुंबात राहून देवरी येथे चौथ्या वर्गात शिक्षण घेत होती. वडील कोरोना काळामध्ये वारल्यामुळे घरची जबाबदारी ही आई अरुणा हिच्या अंगावर होती.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्राम बोळदे येथे आज त्यांचे नातलगाचे लग्न सभारंभाचे कार्यक्रम असल्या कारणामुळे ते आपल्या तिघेही दुचाकीवरून देवरी वरून बोळदे येथे जात होते. सायंकाळी ६:३० च्या सुमारास अर्जुनी/मोर तालुक्यातील नवेगाव/बांध येथे अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागेहून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरून खाली पडले. या भीषण अपघातात अंकुर तसेच त्याची बहीण रितिका यांच्या शरीरावरून वाहन गेल्याने त्यांच्या अक्षरशः चेंदामेंदा झाला. तर आई अरुणा गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना उपचाराकरिता गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन एकच गर्दी केली होती. अचानक या घडलेल्या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
إرسال تعليق