DNA न्यूज़ गोंदिया महाराष्ट्र
अर्जुनी मोर तालुक्यातील धाबे टेकडी आदर्श येथे आज दिनांक 10 एप्रिल रात्री आठ वाजताच्या सुमारास अत्यंत धक्कादायक दुर्दैवी घटना घडली प्रज्वल गोवर्धन मेश्राम वय वर्ष सहा राहणार धाबे टेकडी आदर्श हा चिमुकला लघवी करिता घराच्या बाहेर निघताच दबा धरून बसलेल्या वाघाने क्षणार्धात प्रज्वला उचलून जवळच्या जंगलाच्या दिशेने नेले लगेच घरच्या सदस्यांनी व गावकऱ्यांनी मोठ्याने आरडाओरड करत गावकऱ्यांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली असता घरापासून काही अंतरावर प्रज्वल गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला मात्र या हल्ल्यात प्रज्वल चा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट ऊसळत आहे आणि वनविभागाने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे
إرسال تعليق