महिला सरपंचाने घेतली ठेकेदाराकडून लाच सरपंच व पती शिक्षक यांची निलंबनाची झाली प्रक्रिया सुरू DNA न्यूज़ नेटवर्क

            DNA न्यूज़ नेटवर्क 
सांगली : लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या वाकुर्डे खुर्द (ता. शिराळा) येथील सरपंच शीतल पाटील यांच्या अपात्रतेसाठी जिल्हा परिषदेने प्रक्रिया सुरू केली आहे. शीतल पाटील व त्यांचे शिक्षक पती बाळासाहेब यांना ग्रामपंचायतीच्या ठेकेदाराकडून ३५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते.
शिराळा तहसीलदार कार्यालयासमोर  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली होती. पती-पत्नी दोघांवर शिराळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने सरपंच शीतल यांच्या अपात्रतेसाठी कार्यवाही सुरू केली आहे, तर शिक्षक बाळासाहेब पाटील याच्या निलंबनाची प्रक्रिया प्राथमिक शिक्षण विभागाने सुरू केली आहे.
शीतल पाटील यांना लाच स्वीकारताना पकडल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली आहे. त्या लोकनियुक्त सरपंच आहेत. त्यांच्या अपात्रतेची कारवाइ विभागीय आयुक्तांच्या पातळीवर होणार आहे.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post