महावितरणच्या 62 गुणवंत तांत्रिक कर्मचाऱ्यांचा गौरव;महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

          DNA न्यूज़ नेटवर्क 
नागपूर, : - महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून महावितरणच्या नागपूर परिमंडलात कर्तव्यदक्षतेचा जागर करण्यात आला. वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागपूर व वर्धा जिल्ह्यातील 62 उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांना यावेळी 'गुणवंत कामगार पुरस्कार' आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
नागपूर परिमंडलाच्या काटोल मार्गावरील ‘विद्युत भवन’ येथे आयोजित या सोहळ्यापूर्वी महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी महावितरण व महानिर्मितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह आणि मानपत्र प्रदान करताना मुख्य अभियंता दिलीप दोडके म्हणाले, "तांत्रिक कर्मचारी हा महावितरणचा कणा आहे. काम करताना सुरक्षा साधनांचा वापर करा, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून ग्राहक सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी कटिबद्ध राहा".

पुरस्कारप्राप्त गुणवंत कर्मचारी:
या सोहळ्यात खालील कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला:
 नागपूर शहर मंडल: शंकर मेश्राम, बंडू गायकवाड, सुभाष जाधव, श्रीकांत डहाके, संतोष हिरूळकर, अश्विन गायमुखे, किशोर मुंडले, प्रकाश सावरकर, महावीर बेलेकर, ओमप्रकाश प्रजापती, शिवराज खडसे, हरीष नायक, प्रतिभा गौरकर, राहुल मेश्राम, प्रतिभा पंधरे, प्रमोद फुलझेले, रामा सोनवने, राजेशकुमार बावनकुळे, भूषण टेकाम, राजेशसिंग ठाकूर, रविकांत वाटकर, विजय बर्वे, निशांत गुरवे, युवराज पौनीकर.
 नागपूर ग्रामीण मंडल: राजेंद्र मोहोड, राजेश खंडाळकर, मनिष मेश्राम, मुकुंदा भदाडे, भिमराव घुरीले, धिरज दाभाडे, विक्रांत चौधरी, प्रणय कांबळे, रुपेशकुमार रणदिवे, परमानंद बनगय्या, सतिश रंगारी, राजेंद्र वेळेकर, मयुर ढेरे, संजय अड्डडे, राधेश्याम शेरकुरे, मेघराज रंगारी, प्रतिभा मेंढे, गुरुदेव सुरसे, सुमित ससनकर, राजकुमार गजभिये, धिरज झाडे, विनोद पाटील.
 वर्धा मंडल: धर्मदत्त बुरे, दिलीपकुमार तडस, गिरीश रोडे, प्रविण वासाडे, विठ्ठल धारणे, समिर पिंपळशेंडे, अमोल शिंदे, संतोष उमाटे, गजानन तिवाडे, चंद्रभान टेकाडे, दिनेश परचाके, रसिका इनवाते, कैलास पोटे, भूषण कच्छवाह, लिलाधर ढोबळे, पंकज गवळी.
या कार्यक्रमाला अधीक्षक अभियंता अमित परांजपे, संजय वाकडे, कार्यकारी अभियंता समीर टेकाडे, चंदन तल्लरवार, राहुल जीवतोडे, धम्मदीप फुलझेले, महेश चतुर्वेदी, आणि उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन व्यवस्थापक (मानव संसाधन) अमित पेढेकर यांनी केले. या सोहळ्याला मोठ्या संख्येने अभियंते, कर्मचारी आणि विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

0 تعليقات

إرسال تعليق

Post a Comment (0)

أحدث أقدم