गोंदिया जिल्ह्यात स्वगणनेला सुरुवातजिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: केली स्वगणना

DNA न्यूज गोंदिया
  गोंदिया : जिल्ह्यात दि.1 मे 2026 पासून स्वगणना मोहिमेला सुरुवात झालेली आहे. यामध्ये नागरिकांना स्वगणना (Self Enumeration) चा पर्याय उपलब्ध आहे. याप्रसंगी प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी,गोंदिया यांनी स्वत: स्वगणना केली असून स्वगणना प्रक्रियेमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदवून या राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांनी केले आहे.
          जनगणेचा पहिला टप्पा घरयादी व घरगणना दि.16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत होणार आहे. ज्यामध्ये प्रगणक नागरिकांच्या घरोघरी जाऊन, 33 प्रकारचे प्रश्न विचारुन मोबाईल ॲपच्या माध्यमातून माहिती संकलीत करणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये स्वगणना (Self Enumeration) चा पर्याय दि.1 मे ते 15 मे 2026 पर्यंत उपलब्ध असणार आहे. यामध्ये नागरिकांना वेब पोर्टलच्या माध्यमातून स्वत:ची माहिती सुरक्षीतपणे भरता येणार आहे. नागरिकांनी स्व-गणनेसाठी https://se.census.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. या प्रक्रियेसाठी प्रगणक आपल्या घरी आल्यानंतर त्यांच्याशी Self Enumeration ID शेअर करावे.
जनगणना कर्मचारी आपल्या घरी आल्यानंतर त्यांना योग्य ते सहकार्य करुन या राष्ट्रीय मोहिमेत सहभाग नोंदवून ‘जनगणनेतून जनकल्याण’ हे ब्रीदवाक्य सार्थक ठरवत जिल्ह्याची जनगणना यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी, गोंदिया यांनी केले आहे.

0 تعليقات

إرسال تعليق

Post a Comment (0)

أحدث أقدم