بلا عنوان

वनहक्क कायद्याचे प्रवर्तक डॉ. देवाजी तोफे यांची मगरडोह येथे सदिच्छा भेट; आदिवासींकडून होणारे वन संवर्धन आणि मायनिंगविरुद्धच्या लढ्यावर महत्त्वपूर्ण चर्चा!

मारडोह ग्रामसभा विरुद्ध वनविभाग हा प्रकरण 2021 पासून न्यायप्रविस्ट असून, डा. देवाजी तोफे साहेब यांच्या येण्याने आमच्या लढ्‌याला गती प्राप्त झाली....

विलास भोगारे (पेसा अभ्यासक)

वनहक्क काय‌द्याचे प्रवर्तक डॉ. देवाजी तोफे यांनी नुकतीच गट ग्रामपंचायत मगरडोह येथे सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती मगरडोहच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत आदिवासी संस्कृतीतून होणारे वन संवर्धन, जंगलाचे शाश्वत व्यवस्थापन, वाढती उष्णता, व्याघ्र प्रकल्प व मायनिंगमुळे (खाणकाम) निर्माण होणारे धोके यांवर मंथन करून भविष्यातील व्यापक रणनीती आखण्या बाबत सखोल चर्चा करण्यात आली.

ग्रामीनान कडून तसेच आदिवासींकडून होणारे नैसर्गिक वन संवर्धनः आदिवासी समाज हा पिढ्यानपिढ्या जंगलाचे रक्षण करत आला आहे. आदिवासींची जीवनपद्धती आणि संस्कृतीच निसर्गाला पोषक आहे. जल, जंगल आणि जमिनीचे रक्षण सरकारी यंत्रणेपेक्षा स्थानिक आदिवासी समाज अधिक चांगल्या आणि पारंपारिक पद्धतीने करू शकतो, यावर बैठकीत विशेष भर देण्यात आले. स्थानिक लोकांच्या उपजीविकेसाठी 'गौण वनउपज' (मोहफुले, चारोळी, तेंदूपत्ता इ.) संकलन हा मुख्य आधार आहे. जंगलाचे नुकसान न करता, निसर्गाचा समतोल राखून शाश्वत पद्धतीने वनउपज संकलन व त्याचे व्यवस्थापन कसे करावे, यावर डॉ. तोफे यांनी मार्गदर्शन केले. वाढती उष्णता (ग्लोबल वॉर्मिंग) व पर्यावरण पूरक पावलेः

सध्या वाढत चाललेली उष्णता आणि हवामान बदलाचे संकट रोखण्यासाठी पारंपरिक जंगलांचे संवर्धन करणे हाच एकमेव मार्ग आहे. सामूहिक वनहक्क समितीने यामध्ये पुढाकार घेऊन वृक्षलागवड व जंगल संरक्षणाची गती वाढवण्याचे ठरवले. व्याघ्र प्रकल्पांमुळे निर्माण होणाऱ्या समस्याः

व्याघ्र प्रकल्पांच्या विस्तारामुळे स्थानिक आदिवासी व वननिवासींच्या हक्कांवर गदा येत असून, त्यांच्या

स्थलांतराचा आणि रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. या अन्यायाविरुद्ध कायद्याच्या चौकटीत राहून

आपल्या हक्कांचे संरक्षण कसे करावे, यावर रणनीती ठरवण्यात आली.

निसर्गाचा विनाश करणाऱ्या आणि आदिवासींना विस्थापित करणाऱ्या कॉर्पोरेट मायनिंग (खाणकाम) प्रकल्पांविरुद्ध सामूहिक एकजूट उभी करण्याचा निर्धार करण्यात आला. जल, जंगल आणि जमीन वाचवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत मायनिंगला तीव्र विरोध करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

"आदिवासी आणि जंगल यांचे नाते अतूट आहे. निसर्गाचे खरे संवर्धन आदिवासी बांधवच करू शकतात. आज मायनिंग आणि व्याघ्र प्रकल्पांच्या नावाखाली स्थानिक लोकांचे हक्क हिरावून घेण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत, त्याविरोधात वनहक्क काय‌द्याच्या ताकदीने आपल्याला एकजूट होऊन लढावे लागेलअसे प्रतिपादन डॉ. देवाजी तोफे यांनी केले." या बैठकीला गट ग्रामपंचायत मगरडोहचे सरपंच, उपसरपंच, सामूहिक वन हक्क समितीचे अध्यक्ष सचिव सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती मगरडोह अंतर्गत येणाऱ्या बांबू, तेंदु, तसेच मत्स्य व्यवस्थापनाचे पदाधिकारी सौ. ताराबाई भोयर, सौ जिजाबाई भोयर, देवेंद्रर्जी गावळ, मोहनजी कुरसुंगे, मोतीरामजीं तोफे, रमेशजी आचले, धनराजर्जी कोरेटी, देवेंद्रजीं नैताम, पुणेशजीं भोयर मोहनजी मडावी व मगरडोह ग्रामवासी तसेच पदाधिकारी प्रमुखांने उपस्थीत होते. बैठकीच्या शेवटी मगरडोह परिसराच्या जल, जंगल आणि जमिनीच्या रक्षणासाठी सर्वांनी सामूहिक लढा देण्याची शपथ घेतली

0 تعليقات

إرسال تعليق

Post a Comment (0)

أحدث أقدم