DNA न्यूज़ नेटवर्क गोंदिया
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा पक्ष संघटनेत प्रदीर्घ काळ निष्ठेने कार्य करणारे राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांचे शुक्रवार, १२ जून रोजी गोंदिया जिल्ह्यात प्रथम आगमन होत आहे. यांची राज्यसभा सदस्यपदी झालेल्या अविरोध निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच संपूर्ण पूर्व विदर्भात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या राजेंद्र जैन यांना राज्यसभेवर संधी मिळाल्याने पूर्व विदर्भाच्या राजकीय प्रतिनिधित्वाला नवी ताकद मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निवडीचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत असून, कार्यकर्त्यांमध्ये आनंद आणि अभिमानाचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्वागतासाठी जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, १२ जून रोजी सकाळी ०९.३० वाजता बाबूजी स्व.मनोहर भाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, निवास स्थान बगीचा रामनगर, सकाळी १०.०० वाजता माननीय खासदार श्री प्रफुल पटेल यांचे जनसंपर्क कार्यालय, पाल चौक, सकाळी १०.१० वाजता लोहपुरुष सरदार वल्लभभाई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, राजलक्ष्मी चौक, सकाळी १०.१५ वाजता दिगंबर जैन मंदिर येथे दर्शन, गोरेलाल चौक, तत्पश्चात विश्वरत्न प.पू.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, पंडित जवारलाल नेहरू यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, सकाळी १०.३० वाजता देशबंधू वॉर्ड निवास स्थान येथून प्रारंभ करून दुर्गा चौक, गोरेलाल चौक, गांधी चौक, देवेंद्रनाथ चौबे यांचे निवास स्थान - पंजाब नॅशनल बँक समोर, जयस्तंभ चौक त्यानंतर जलाराम लॉन येथे जाहीर सत्कार सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
राज्यसभेच्या माध्यमातून जिल्हा व पूर्व विदर्भातील विकासात्मक प्रश्नांना राष्ट्रीय स्तरावर प्रभावीपणे मांडण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. श्री राजेंद्र जैन यांच्या आगमनानिमित्त जिल्हाभरात स्वागताची जोरदार तयारी सुरू असून, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पक्ष कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा संघटनेने सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवनिर्वाचित खासदारांचे स्वागत करावे, असे आवाहन केले आहे.

إرسال تعليق