DNA न्यूज़ नेटवर्क
: विना परवाना अॅलोपॅथिक औषधांची विक्री करून रुग्णांच्या आरोग्याशी खेळणाºया नागपुर शहरातील धंतोली येथील एका नामांकित क्लिनिकवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धाड टाकत सुमारे ७ लाख रुपयांचा औषधसाठा जप्त केला. तपासादरम्यान क्लिनिककडे वैध औषधविक्री परवाना नसल्याचे तसेच दुसºया परवानाधारक पेढीच्या नावाने रुग्णांना औषधांची बिले दिली जात असल्याचे उघडकीस आले आहे.
अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार धंतोली गार्डनजवळील ‘न्यू रूट्स स्किन, लेझर अँड हेअर ट्रान्सप्लांट क्लिनिक’ येथे विना परवाना औषधविक्री सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार ३ जून रोजी आयुक्त तुकाराम मुंडे व सहआयुक्त (औषधे) मिलिंद काळेश्वरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएच्या पथकाने क्लिनिकची तपासणी केली. यात मोठ्या प्रमाणात अॅलोपॅथिक औषधसाठा आढळून आला. आॅपरेशन मॅनेजर आकांक्षा बोंद्रे यांच्याकडे औषध खरेदीची कागदपत्रे मागितली असता ती सादर करण्यात आली नाहीत. विशेष म्हणजे, क्लिनिककडे औषधविक्रीचा परवाना नसतानाही नाशिक येथील ‘११६ रेमेडीज’ या परवानाधारक संस्थेच्या नावाने रुग्णांना बिले देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम १९४० च्या कलम १८ चे उल्लंघन झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष प्रशासनाने नोंदविला आहे
إرسال تعليق